Tuesday 1 October 2013

शारदीय नवरात्र



     आपल्या लाडक्या सदगुरुच्या लाडक्या मोठा आईचं अश्विन शुद्ध नवरात्र. नवरात्र म्हणजे काय? तर मातेच्या पावित्र्याचा जल्लोष आणि पावित्र्य हेच प्रमाण. 
प.पु. बापूंनी मातृवात्सल्यविन्दानम मध्ये सांगितल्याप्रमाणे अश्विन शुद्ध नवमीचा पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी जानकीने अग्निदिव्य केले व श्रीराम जानकी लक्ष्मण  यांनी मिळून महिषासुर मर्दिनीचे 'श्रीवज्रमंडलपीठपूजन' केले त्यासाठी अष्टादशभुजा महिषासुर मर्दिनीची मृण्मयी मूर्ती साक्षात हनुमंताने बनवलेली होती
ह्या श्रीरामवरदायीनी च्या अवताकार्यामुळे व श्रीरामांनी केलेल्या पूजनामुळे अश्विन महिन्यात अशुभानाशिनी नवरात्रीपूजन सुरु झाले. 
      नवरात्री उत्सवाच्या नावामध्येच या उत्सवाच महत्व सामावलेलं आहे. या उत्सवाला नवदिवस का नाही म्हटलेलं? हा रात्रीचा खेळ आहे. ही त्या नऊ रात्रीची किमया आहे. रात्री आईचं तेज ओज दिवसापेक्षा कितीतरी अधिक पटीने कार्यरत असत. आणि ह्या तेजाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सदगुरू आपल्याला रामरसायन, मातृवात्सल्य विन्दानम तसेच मातृवात्सल्य उपनिषदाचे
पठण करण्यास सांगतात.
      मातृवात्सल्य उपनिषदामध्ये उत्तम, मध्यम व विगत नित्यगुरूंना विचारतात कि आम्ही याआधीही नवरात्री उत्सव साजरा केला आहे. पण त्याचे महत्व व त्यामागील तत्व न समजून घेताच.....  त्यावर नित्यागुरू सांगतात की  तुम्ही सदैव आपल्या हातून चूक होऊन मातेचा कोप तर होणार नाहीना या भीतीखाली उत्सवाचे  हे पवित्र दिवस साजरे करता. ह्या काळात आदिमातेला तिच्या संपूर्ण परिवारासह प्रत्येक श्रद्धावानाबरोबर या उत्सवात सामील होऊन आनंदोत्सव करणे हि सर्वस्वी तिची इच्छा असते. 
चैत्र  व अश्विन अर्थात शुभंकरा व अशुभनाशिनी अशा दोन्ही नवरात्रीत मन:पुर्वक उत्सव करणाऱ्या एवढच नाही तर त्या काळात तिचे दर्शन घेणाऱ्या श्रद्धावानासाठी आदिमाता ३ वरदाने देत असते.
१.  दोन्ही नवरात्रीमध्ये आदिमाता तिच्या परिवारासह पृथ्वीवर सर्वत्र संचार करीत असते.
२.  ह्या नवरात्री काळामध्ये जो कोणी कमीतकमी एक रात्र 'मातृवात्सल्या'चे पठण वाचन श्रवण करीत राहतो. त्याचा मस्तकावर आदिमाता मग स्वतःचा एका हाताने स्पर्श करते.
३.  ह्या आदिमातेचा स्पर्श पुढल्या वर्षीचा नवरात्रीपर्यंत प्रभावी राहतो.
विगताने त्रिविक्रमाला शंका विचारली कि माझ्याकडे या पाप्याकडे सुद्धा आदिमाता येईल का?
त्यावर त्रिविक्रम सांगतात हा काय प्रश्न आहे? तुम्ही कितीही चुका कितीही पापी असा ती तुमच्या वर सदैव प्रेम करीत राहते.
      सदगुरू अनिरुद्ध उपनिषदा मध्ये आपल्याला ही ग्वाही देतात कि माझ्या या मातेच तुम्हा प्रत्येकावर खूप खूप प्रेम आहे. आणि म्हणूनच नवरात्री उत्सव म्हणजे खर तर आदिमातेचा प्रेमोत्सवच असतो. आणि नवरात्री उत्सव फक्त प्रेमानेच साजरा होऊ शकतो.

1 comment:

  1. नम: सर्व शुभंकरे l नम: ब्रम्हत्रिपुरसुंदरी l
    शरण्ये चंडीके दुर्गे l प्रसीद परमेश्‍वरी ll
    ----------------------------------------------------
    श्री राम !! Ambadnya..!!!

    ReplyDelete