भक्ति


नाम:
भगवंताचे नाम हाच भगवंत व भक्त ह्यांच्यामधील सर्वात सोपा व सुंदर सेतू आहे .

मंत्र :
ज्याच्यायोगे मनुष्यास देवत्वाचे सानिध्य लाभते अशा पवित्र शब्दाचा समुदाय म्हणजे "मंत्र". ज्याचे व ज्याच्या सहाय्याने चिंतन व मनन केले असता सर्व प्रकारचे रक्षण होते. मंत्र हा मानवाच्या जीवनाला प्रगती  पथावर नेणारा व गतिमान करणारा अलौकिक असा उर्जास्त्रोत्र असतो.
  • मानवी मनाची १०८ शक्तीकेंद्रे आहेत. कुठल्याही मंत्राचा जप १०८ वेळा सलग केल्यास जरी आमचे मन एकाग्र झाले नाही तरी त्या मंत्राचा प्रभाव आमच्या मनावर कार्य करू लागतो. मनामधील वाईट बीजांचा नाश होऊ लागतो व चांगल्या बीजांना ताकद मिळू लागते  त्यामुळे सर्व प्रकारची दुर्लभता नाहीशी होऊ लागते. 
  • प्रारब्ध  बदलणे म्हणजे मन बदलणे आणि त्या साठी भक्तिपूर्ण जपाची खूप मोठी मदत होते. 
  • जप मोठ्याने केला, फक्त ओठातल्या ओठात केला किवां मनामध्ये केला ह्याहीपेक्षा अनंतपटीने जप कुठल्या भावाने केला हि गोष्ट महत्वाची आहे.
  • ॐ  म्हणजे भगवंताने भक्ताच्या हाकेला दिलेली ओ आहे.
  • गायत्री मंत्र हा सामान्य मानवाला श्रेष्ठत्वाकडे नेणारा एक उदात्त मंत्र आहे. 
  • ओम कार हा परमात्म्याचा प्राण आहे. 
  • गायत्री मंत्र हे परमात्म्याचे चित्त आहे. 
  • रामनाम हे परमात्म्याचे शरीर आहे.

प्रार्थना :
 प्रार्थना म्हणजे मानवाने स्वतःच्या ताकदीच्या मर्यादा ओळखून परमात्म्याचे अनंत, अपार व अमर्याद सामर्थ्य जाणून स्वतःच्या सामर्थ्य वृद्धीसाठी त्या परमेश्वराला अत्यंत प्रेमाने केलेले आव्हान  होय. 
  • प्रार्थना म्हणजे भगवंताच्या नामाचा Stamp लावून मानवाच्या बुद्धीने अंतः करणाला पाठविलेले स्मरणपत्र  होय. 
  • निष्काम मनाने किवा ''फक्त तूच हवास'' ह्या एकमेव प्रेरणेने केलेली परमात्म्याची प्रार्थना म्हणजे आनंदपूर्ण जीवणाचे एकमेव सूत्र होय. 
स्तोत्र :
परमेश्वराची स्तुती व भक्ताचे मनोगत हे दोन भाव ज्याच्यात एकत्र येतात, त्यासच ''स्तोत्र'' असे म्हणतात.
  • स्तोत्र हे मानवासाठी  आपल्या नैतिक आकांक्षा पूर्ण करून घेण्याचे अमोघ साधन आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे ह्या संपूर्ण विश्वातील कालातील असे एकमेव सर्वश्रेष्ठ स्तोत्र आहे." रामरक्षा म्हणजे स्वतःच्या जीवनात रामाला सिंहासनावर अभिषिक्त करण्याचा एकमेव अद्वितीय मह्न्मंगल विधी"

1 comment:

  1. रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
    रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
    रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ ।
    रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥

    राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
    सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥३८॥

    ReplyDelete