सदगुरू उवाच

।।  हरि  ॐ ।।

आपण हरि ॐ  का म्हणतो ?

हरि म्हणजे : परमेश्वराचे सगुण साकार स्वरूप 

ॐ  म्हणजे : परमेश्वराचे निर्गुण निराकार स्वरूप

आपण ॐ हरि का म्हणत नाही? 

आपण एखाद्या इमारतीत डायरेक्ट  नवव्या मजल्यावर जाऊ शकतो का? नाही, एक नंतर दुसरा नंतर तिसरा असं करत करतच नवव्या मजल्यापर्यंत जाऊ शकतो. हेलीकॉप्टरच्या सहाय्याने हे शक्य आहे. पण आपण कोणी योगी नाही,  हे एका योग्यालाच शक्य आहे. भौतिक शास्त्र हे एक साध शास्त्र आहे. त्यातील  प्रकाश या धडया  अंतर्गत पाचवीच्या विद्यार्थ्याला आणि दहावीच्या विद्यार्थ्याला  शिकवली जाणारी माहिती वेगवेगळी आहे.  कारण पाचवीच्या विध्यार्थाची व दहावीच्या विध्यार्थ्याची  ज्ञान ग्रहण करण्याची कुवत ही वेगवेगळी आहे. हा एक प्रवास आहे हरि पासून ॐ  पर्यंतचा.
जेंव्हा सगुण साकाराची उपासनेच्या शक्तीला ॐ  काराशी जोडलं जात तेंव्हा ती उपासना अधिक सामर्थ्यवान होते. प्रत्येक मंत्राच्या सुरवातीला ॐ कार जोडला जातो.
संपूर्ण विश्वाच्या भावना यांच्या मध्येच आहेत. हा एक फळा-फुलांनी बहरलेला वृक्ष आहे. संपूर्ण विश्वाच्या भावना यांच्या मध्येच आहेत. हा एक फळा-फुलांनी बहरलेला वृक्ष आहे. र्र्ही म्हणो हरि  सा-या विश्व्वाची स्पंदने यात  समाविष्ट आहेत.  जेंव्हा आपण हरि ॐ  म्हणतो तेंव्हा  वाईट स्पंदन आपल्यापर्यंत  पोहोचू शकत नाहीत कारण ही पूर्णतः शुद्ध स्पंदन आहेत.  जिथे  अशुद्धतेला  वावच नाही.

   उदा. - ॐ  कृपासिंधु श्री साईनाथाय नमः। 
             ॐ श्री गणेशाय नमः।
गणेश म्हणजेच ॐ कार -जर गणेशाची मूर्ती आणि ॐ काराचे चित्र बघीतले तर त्यात फरक दिसून येत नाही. 

आपल्याला गणेशाच्या जन्माची कथा तर माहित आहे.  ती साधी कथा नाही. ती एक रूपकात्मक कथा आहे. शाबर मंत्र - असंस्कृत मंत्र
वैदिक मंत्र - संस्कृत  मंत्र ( संस्कृत- यावर उचित संस्कार झाले आहेत असे आहे ते संस्कृत).
गणेश आणि शिव यांच्यातील युद्ध- पूर्ण ज्ञानाने युक्त असे मंत्र व असंस्कृत मंत्र यातील युद्ध.
गणेश मणजे मायेने उत्पन झालेला मंत्र. आपण गणेशाला मंत्र स्वरूप म्हणतो ते याच मुळे. आवश्यकता पूर्ण करण्यासाठी या साधनेचा उपयोग केला जातो. हे गणेशाचे विनायक स्वरूप आहे. शिवाने शिरच्छेद केल्यानंतर त्यावर हत्तीचं मुख बसवलं जात म्हणजे मुळ मंत्राशी असंस्कृत मंत्राला जोडलं जातं
काळी जादू करणारे लोकं ॐ कारचा उच्चार कधीच पूर्णपणे  करत नाहीत. ते राम नाम कधीही उच्चारत नाहीत. सदगुरू  तत्वाशी कुठलीही वस्तू आपल्या जवळ असेल तर काळी जादू आपल्यावर परिणाम करू शकत नाही. 


गुरु : अंधाराचं रुपांतर प्रकाशात करतो तो गुरु. जो आपल्यातील वाईट गुणांचं रुपांतरचांगल्या गुणांमध्ये करतो तो गुरु. 

प्रत्येक गोष्टीला शुद्धता प्रदान करणारी स्पंदने ॐ कारामध्ये आहेत. आपण हरि ॐ म्हणतो कारण हरि ची स्पंदने जी माझ्याकडे असतात ती शुद्ध असतात. ॐ काराच्या स्पंदनांना ही हरि ची स्पंदने आकर्षित करतात. दोघांच्या  एकत्रित उच्चाराने जी स्पंदने निर्माण होतात ती ग्रहण करणे सोपे असते.  हरि ॐ म्हणणं   आवश्यक आहे. हरि आणि ॐ या दोघांची एकत्रित स्पंदने म्हणजेच हरिप्रिया (राधा). .ही स्पंदने आपल्या भोवताली असणा-या तेजोवलयात उत्पंन होतात. ज्या  व्यक्तीला अधिक राग येतो त्या व्यक्तीचे तेजोवलय विरळ असते. हरि ॐ म्हटल्यामुळे तेजोवलयाचे शुद्धीकरण होते व ते अधिक दात होते प्रत्येकाला शारीरिक,  मानसिक तसेच अध्यात्मीक  प्रभा असते, यामुळे कांती बनते. आणि राधा ही हरीची कांती आहे. प्रभा आहे. त्यामुळे प्रमाणे हरि ॐ म्हणा. 

रामनाम, शिवनाम, गुरुनाम यांत हरिनामाची स्पंदने असतात. गुरुनामात त्या नामाच्या स्पंदनाबरोबर गुरु नामाचीही स्पंदने  असतात. गुरुनाम स्थिरता, संतुलन, गुरुत्व, शांती, आकर्षण शक्ती प्रदान करतं. गुरुत्वाच्या सर्व गुणांना आकर्षित करणारी शक्ती प्रदान करतं.  आयुर्वेद शास्त्रानुसार एकूण २० गुण आहेत. सारे गुण या गुरु  गुणात समाविष्ट असतात. जो जन्माला येतो तो लघु असतो. गुरु म्हणजे जो गुरु  गुणांनी युक्त आहे, याला जन्म-मृत्यूच्या मर्यादा नाहीत. मानव गुरु होऊ शकत नाही. गुरुनाम जीवनाला संतुलीत करतं .


हरि ॐ म्हटल्याने आपोआप मनात गुरुत्वाकर्षण शक्ती उत्पन्न होते व सदगुरू शक्ती आपल्याकडे आकर्षित होते. मग इतर गोष्टी आकर्षित करण्याची गरज उरत नाही. हरि ॐ म्हणत रहा. दिवसातून १०८ वेळा म्हणा, एकत्रितपणे नाही कारण ही काही उपासना नाही.हे सहजपणे होणे आवश्यक  आहे 

हरि ॐ पूर्णतः  सकारात्मक भावना आहे  आणि गुरुनामा बरोबर हरि ॐ म्हणणं म्हणो POSITIVE VIBRATIONS WITH SPECIFIC DIRECTION. 


।।  हरि  ॐ ।।

No comments:

Post a Comment