Tuesday, 19 November 2013


II अनिरुद्ध पौर्णिमा II
किरातरुद्र

             प्रत्येक विश्वघटकाची निर्मिती चंडिकाकुलातूनच होते, लयही चंडिकाकुलातच होतो आणि निर्मिती व लय ह्यांमधील स्थिती व गती घडवून आणणारे, विश्वाला संचालित व अनुशासित करणारेही  चंडिकाकुलच आहे. प्रत्येक विश्वघटक चंडिकाकुलाच्या अधिकारक्षेत्रातच असतो. 
       चंडिकाकुलात आदिमाता चंडिकेसह ज्येष्ठ चंडिकापुत्र श्रीगुरुदत्तात्रेय, दत्तात्रेयांचेच प्रतिरूप असणारा महाप्राण श्रीहनुमंत, द्वितीय चंडिकापुत्र किरातरुद्र (सदाशिव),  किरातरुद्राची सहधर्मचारिणी शिवगंगागौरी आणि तृतीय चंडिकापुत्र परमात्मा (परमशिव - त्याची शक्ती आल्हादिनी व त्याचा अनुचर आदिशेष यांसह ) विराजमान असतात. 
               प्रत्येक मानवाची प्रार्थना येउन पोहोचते, ती या चंडिकाकुलाकडेच आणि त्या त्या मानवाच्या भक्तिनुसार त्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळतो, तोदेखील चंडिकाकुलाकडूनच.
               बाह्य आणि अन्तःसृष्टीचे संतुलन उचित बिंदूवर सांभाळणे हे  किरातरुद्र आणि शिवगंगागौरी यांचे महत्वाचे कार्य आहे. पावित्र्याला स्तंभ म्हणजेच आधार देणे, उचिताला प्रेरणा देणे आणि अनुचिताचे स्तंभन करणे हेच कार्य श्रद्धावानांसाठी हे दोघे सदैव करत असतात. 
               मानवाचे मन हे एक जंगल आहे. अहंकार, षड्रिपू आदी अनेक हिंस्त्र श्वापदे म्हणजेच दुर्वृत्ती त्यात वावरत असतात. त्यांचा सामना करण्यात मानवाची कुवत तोकडी पडते. प्रत्येकाला त्याचे स्वतःचे युद्ध एकट्यानेच लढायचे असते. 
               मानव जेव्हा सदगुरुतत्वाची (परमात्म्याची) भक्ती करू लागतो, तेव्हा त्याला क्षणिक मोहांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य परमात्म्याकडून प्रदान केले जते. यातूनच या अरण्यात पर्वतशिखरांची निर्मिती होते. त्याचबरोबर परमात्म्याच्या श्रद्धावानांसाठी किरातरुद्र सक्रिय होतो आणि या मनोरूपी जंगलात  पर्वतशिखरांच्या अग्रावर राहतो. 
                हिंस्त्र श्वापदांची शिकार हा त्याचा छंद आहे आणि श्रद्धावानांना अभय देणे हि त्याची सहज लीला आहे. किरातरुद्र या जंगलातील सर्व श्वापदांचा म्हणजेच दुर्वृत्तींचा नाश करतो आणि श्रद्धावानाचा विकास घडवून आणतो. 
                प्रत्येक मानवास त्याचा समग्र विकास साधण्यासाठी चिंतन, शोध आणि अभ्यास यांची गरज असते. या तीनही तत्वांचा समतोल साधण्याचे सामर्थ्य श्रद्धावानांना त्रिपुरारी पौर्णिमेस त्रिपुरारी त्रिविक्रम परमात्मा, त्याची शक्ती आल्हादिनी, किरातरुद्र आणि शिवगंगागौरी यांच्याकडून सहजपणे प्राप्त होत असते. यासाठीच  त्रिपुरारी पौर्णिमेस पवित्र संकल्प करून तो पूर्ण होण्यासाठी किरातरुद्र पूजन आणि त्याची प्रार्थना केली जाते . 

Thursday, 17 October 2013

Navaratrotsav Seva At Mahalaxmi Temple, Kolhapur - Summery Report


II Hari Om II
Sadguru Shri Aniruddha Upasana Kendra, Kolhapur.

Navaratrotsav Seva At Mahalaxmi Temple, Kolhapur - Summery Report





Seva Provided By Our Sanstha :-

1) Crowd Controll

2) First Aid

3) Drinking Water Distribution

4) Swacchata After Every Night Palakhi Pradakshina

Tuesday, 1 October 2013

शारदीय नवरात्र



     आपल्या लाडक्या सदगुरुच्या लाडक्या मोठा आईचं अश्विन शुद्ध नवरात्र. नवरात्र म्हणजे काय? तर मातेच्या पावित्र्याचा जल्लोष आणि पावित्र्य हेच प्रमाण. 
प.पु. बापूंनी मातृवात्सल्यविन्दानम मध्ये सांगितल्याप्रमाणे अश्विन शुद्ध नवमीचा पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी जानकीने अग्निदिव्य केले व श्रीराम जानकी लक्ष्मण  यांनी मिळून महिषासुर मर्दिनीचे 'श्रीवज्रमंडलपीठपूजन' केले त्यासाठी अष्टादशभुजा महिषासुर मर्दिनीची मृण्मयी मूर्ती साक्षात हनुमंताने बनवलेली होती
ह्या श्रीरामवरदायीनी च्या अवताकार्यामुळे व श्रीरामांनी केलेल्या पूजनामुळे अश्विन महिन्यात अशुभानाशिनी नवरात्रीपूजन सुरु झाले. 
      नवरात्री उत्सवाच्या नावामध्येच या उत्सवाच महत्व सामावलेलं आहे. या उत्सवाला नवदिवस का नाही म्हटलेलं? हा रात्रीचा खेळ आहे. ही त्या नऊ रात्रीची किमया आहे. रात्री आईचं तेज ओज दिवसापेक्षा कितीतरी अधिक पटीने कार्यरत असत. आणि ह्या तेजाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सदगुरू आपल्याला रामरसायन, मातृवात्सल्य विन्दानम तसेच मातृवात्सल्य उपनिषदाचे
पठण करण्यास सांगतात.
      मातृवात्सल्य उपनिषदामध्ये उत्तम, मध्यम व विगत नित्यगुरूंना विचारतात कि आम्ही याआधीही नवरात्री उत्सव साजरा केला आहे. पण त्याचे महत्व व त्यामागील तत्व न समजून घेताच.....  त्यावर नित्यागुरू सांगतात की  तुम्ही सदैव आपल्या हातून चूक होऊन मातेचा कोप तर होणार नाहीना या भीतीखाली उत्सवाचे  हे पवित्र दिवस साजरे करता. ह्या काळात आदिमातेला तिच्या संपूर्ण परिवारासह प्रत्येक श्रद्धावानाबरोबर या उत्सवात सामील होऊन आनंदोत्सव करणे हि सर्वस्वी तिची इच्छा असते. 
चैत्र  व अश्विन अर्थात शुभंकरा व अशुभनाशिनी अशा दोन्ही नवरात्रीत मन:पुर्वक उत्सव करणाऱ्या एवढच नाही तर त्या काळात तिचे दर्शन घेणाऱ्या श्रद्धावानासाठी आदिमाता ३ वरदाने देत असते.
१.  दोन्ही नवरात्रीमध्ये आदिमाता तिच्या परिवारासह पृथ्वीवर सर्वत्र संचार करीत असते.
२.  ह्या नवरात्री काळामध्ये जो कोणी कमीतकमी एक रात्र 'मातृवात्सल्या'चे पठण वाचन श्रवण करीत राहतो. त्याचा मस्तकावर आदिमाता मग स्वतःचा एका हाताने स्पर्श करते.
३.  ह्या आदिमातेचा स्पर्श पुढल्या वर्षीचा नवरात्रीपर्यंत प्रभावी राहतो.
विगताने त्रिविक्रमाला शंका विचारली कि माझ्याकडे या पाप्याकडे सुद्धा आदिमाता येईल का?
त्यावर त्रिविक्रम सांगतात हा काय प्रश्न आहे? तुम्ही कितीही चुका कितीही पापी असा ती तुमच्या वर सदैव प्रेम करीत राहते.
      सदगुरू अनिरुद्ध उपनिषदा मध्ये आपल्याला ही ग्वाही देतात कि माझ्या या मातेच तुम्हा प्रत्येकावर खूप खूप प्रेम आहे. आणि म्हणूनच नवरात्री उत्सव म्हणजे खर तर आदिमातेचा प्रेमोत्सवच असतो. आणि नवरात्री उत्सव फक्त प्रेमानेच साजरा होऊ शकतो.