Saturday 14 December 2013

!! श्रीवर्धमान व्रताधिराज !!


!! श्रीवर्धमान  व्रताधिराज !!


१.) व्रतकाल  व पठण 
-मार्गशीर्ष  महिन्याच्या पौर्णिमेस या व्रताचा आरंभ करावा. 
-मार्गशीर्ष पौर्णीमा हा पहिला दिवस धरून एकंदर तीस दिवस ह्या व्रताचा काळ आहे.-बरोबर तीसाव्या दिवशी व्रताचे उद्यापन  करावे. ( मग त्या दिवशी कुठलीही तीथी असो.)श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथातील कुठलेही एक पान स्वेच्छेने निवडावे ह्यास "व्रतपुष्प" असे म्हणतात . -मार्गशीर्ष पौर्णीमेस ह्या व्रतपुष्पाचे पठण सुरु करावे.
-मार्गशीर्ष पौर्णीमेस म्हणजेच पहिल्याच दिवशी एकदा पठण करावे. दूस-या दिवशी दोन
-वेळा, तिस-या दिवशी तीन वेळा, चौथ्या दिवशी चार वेळा असे दिवसागणिक एक-एक
-पठण वाढवत न्यावे. तीसाव्या दिवशी तीस वेळा  व्रतपुष्पाचे पठण करावे.
-व्रतपुष्पाचे पठण कोणत्याही वेळेस करावे. परंतू  शक्यतो सलगपणे पठण करावे ( उदा :-दहाव्या दिवशी किंवा  जो दिवस असेल त्या दिवसाच्या संख्येइतके पठण एकाच वेळी सलगपणे करावे.)
-काही अत्यावश्यक कारणामुळे व्रतपुष्पाचे पठण करीत असताना मध्येच उठावे लागले  तरपरत पठणास बसताना, " जय हरी हरेश्वर जय महामाहेश्वर. " असे म्हणून पठण पुढे  चालू करावे.                                                                                                          -पठण परमात्म्याच्या  मूर्ती वा प्रतिमेसमोर (बापूंचा फोटो ) करावे.                            -जमिनीवर अथवा बैठकीच्या साधनावर ( खुर्ची  इत्यादी ) बसताना चटई, सोवळे,         कांबळे,रेशीम वस्त्र किंवा साधे सुताचे कापड ' आसन ' म्हणून वापरण्यास हरकत           नाही.
-परंतु निव्वळ जमिनीवर बसून पठण केल्यास अधिक चांगले.
-प्रत्येकाने आपल्यास आवडणा-या परमात्म्याच्या स्वरूपाची प्रतिमा व्रतासाठी'आराध्य ' म्हणून  पठणाच्या वेळेस आपल्या समोर एका पाटावर किंवा तबकात ठेवावी. नंतर पठण  झाल्यावर मूळ  स्थानी ठेवण्यास हरकत नाही. अशी प्रतिमा घरातील देवघरात व भिंतीवर  असल्यास तिच्याकडे पाहून  पठण करण्यास सहज सोपे जात असेल तर ती खाली  काढण्याची आवश्यकता नाही.  -प्रतिमेस वा मूर्तीस सुंदर हार घातलेला असावा किंवा कमीत कमी प्राप्त फुले वहावीत प्रतिमेसमोर निरंजन इत्यादी दीप प्रकार तसेच सुगंधी उदबत्ती असल्यास अधिकच सुंदर.-एका वेळेस अनेक मंडळी ज्यांचे व्रतपुष्प एकच आहे ( सारखे). एकत्र येवून पठण करू शकतात. स्वतःच्या किंवा इतरांच्या घरी. तसेच या सगळ्यांनी दररोज तीसही दिवस एकत्रच येवून पठण केले पाहिजे असे नाही. एखादा दिवस न आल्यास स्वतःच्या घरी पठण करावे. -पठण सुरु करताना व पठणाच्या शेवटी कमीत कमी प्रत्येकी एक वेळा अनिरुद्ध गायत्री मंत्र  म्हणावा-व्रतकाळात स्त्रीयांचा मासीक धर्म, तसेच इतर कुठल्याही प्रकारचे असौच आड येत नाहीत.( पठण सुरूच ठेवावे )
-व्रतकाळात बाहेर गावी जाणे झाल्यास परमात्म्याची छोटी प्रतिमा घेवून कुठेही  व्रतपठण करण्यास हरकत नाही.
-सर्वच्या सर्व नऊ अंगे पाळल्यास अत्यंत श्रेयस्कर परंतू न जमल्यास व्रतकाळात व      पठण तसेच उदयापनम ही दोन आवश्यक अंगे व उरलेल्या सात अंगापैकी कुठलीही       तीन अंगे पाळणे आवश्यकच आहे.                                                                        -त्या त्या दिवसाचे पठण झाल्यानंतर साष्टांग दंडवत किंवा लोटांगण घालावे.               -व्रताधीराजाचे एकूण नऊ अंग आहेत. त्यापैकी व्रतकाळात ( तीस दिवस ) पठण             (व्रतपुष्प) आणि शेवटचे अंग म्हणजे उद्यापनम  ही करावेच लागतील.
-व्रतकाळ सोडून इतर वेळेस दरवाजास बारा संख्येपेक्षा कमी चिन्हांचे त्रिपुरारी त्रिविक्रम


 २.) वर्ज्य प्रकरण ( अंग दुसरे ) :
-ह्या व्रताच्या काळात सकाळचा नाष्टा अल्पोप आहार तसेच दुपारच्या भोजनात मांसाहाराचे सेवन करू नये. रात्रीच्या भोजनात मांसाहार करण्यास हरकत नाही.

-ह्या संपूर्ण व्रतकाळात कडधान्याचे सेवन अजिबात करू नये. ( तूर, चणा, मटकी, हिरवे-
       काळे-पांढरे वाटणे, राजमा, चवळी, मसूर, वाल, पावटे ). उडीदाचा वापर जरूर करावा व मूग 
वापरण्यास हरकत नाही.

 ३.) तिलस्नानम ( अंग तीसरे ) :
-ह्या व्रतकाळात स्नानाआदी हलक्या हाताने शरीरास तीळाचे तेल लावावे. व नंतर शक्यतो
कोमट वा गरम पाण्याने  स्वच्छ स्नान करावे. कमीत कमी दोन्ही हातास कोपरापासून
खाली व दोन्ही पायास गुडघ्यापासून खाली तीळाचे तेल स्नानाआधी जरूर लावावे. 

-डोक्यास तीळाचे तेल लावण्याची आवशक्यता नाही. 

-तिलस्नानाने भौतिक, प्राणमय व मनोमय अशा तीनही देहांस शुभ स्पंदने स्वीकारणे सोपे
          होते.  
       
४.) त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम  ( अंग चौथे ) :
 -व्रताच्या प्रथम दिवशी घराच्या दरवाजास कमीत कमी बारा त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हांचे
 तोरण बांधावे. 

 -ही चिन्हे तांबे, पंचधातू, चांदी किंवा सोन्यावरच आलेखिलेली असावीत. 

 ५.) त्रिदोष धूपशिखा ( अंग पाचवे ) :
-व्रतकाळात रोज सकाळी प्रत्येक व्रतधारकाने स्नानानंतर ही धूपशिखा लावावी, तसेच

-पठणाची वेळ वेगळी असल्यास त्यावेळीही जरूर लावावी. 

-ही त्रिविध दोषांचा नाश करते. ( कायिक,वाचिक व मानसिक )
 ह्या धूपशिखेच्या प्रभावामुळे व्रत सफल, संपूर्ण होण्यास सहाय्य होते. 

६.) त्रिपुरारी त्रिविक्रम भोग  ( अंग सहावे ) :
-व्रतकाळात रोज सकाळी प्रत्येक व्रतधारकाने परमात्म्यास दहीसाख्रेचा व संध्याकाळी
 दूधसाखरेचा नैवैद्य अर्पण करावा. 

-मात्र त्या दिवशीचा नैवैद्य त्याच दिवशी प्रसाद म्हणून, व्रतधारकाने स्वतः ग्रहण करावा व
 इतरांस द्यावा. 

७.) इच्छा दान  ( अंग सातवे ) :
-व्रतकाळात व्रतधारकाने स्वेच्छेने भगवंतचरणी दक्षिणा अर्पण करावी, तसेच  गरजूस सहाय्य करावे. 

-ह्या व्रतकाळात केलेले दान दशगुणा फल देते. 

८.) पुरुषार्थ दर्शन ( अंग आठवे ) :
-व्रतकाळात प्रत्येक व्रतधारकाने कमीतकमी ९ वेळा परमात्मधामास पवित्र दर्शनासाठी
जावे. 

-ज्या व्यक्तीस शारिरीक करणामुळे घराबाहेर पडणे जमणार नाही अशा व्यक्तींना त्या ऐवजी
 शेवटच्या दिवशी ९ वेळा पठण अधिक करवे. 

९.) उद्यउद्यापन   ( अंग नववे ) :
-व्रताच्या तीसाव्या म्हणजेच सांगतेच्या दिवशी पठण पूर्ण झाल्यानंतर परमात्म्याच्या प्रतिमेस अथवा मूर्तीस सुगंधित पुष्पांचे ९ हार अर्पण करावेत.

-त्यानंतर एका तबकात नऊ दीप ठेऊन ते प्रज्वलित करावेत व आरती ओवाळून        'श्रीनव-अंकुर-ऐश्वर्य कृपाशीर्ष' प्राथना म्हणावी. 


''श्रीनव-अंकुर-ऐश्वर्य कृपाशीर्ष'' प्रार्थना

 नमो देवदेवेश परात्पर दत्तगुरो !
अष्टबीजस्मरणं सर्वथा रामदायकम !!
श्रीः शुद्धत्वं वैराग्यं व्यापकत्वं  द्रां दत्तात्रेयाय नमः!
कालातीतव्यं वात्सल्यं  द्रां दत्तात्रेयाय नमः!
सर्वज्ञत्वं कारुण्यं  द्रां दत्तात्रेयाय नमः !
 नमो महामाहेश्वर प्रणवरूप परमात्मने !
नवांकुरस्मरणं सर्वथा शुभमंगलम !!

श्रीः भर्गः जन्मकर्मनिवारकम - वासुदेवाय नमः !
श्रीः ओजः सर्व आरोग्यदायकम - वासुदेवाय परमपदाय नमः !
श्रीः शान्तिः सर्वत्रसुखकारिणी  परमपदाय नमः !
श्रीः तृप्तिः सदैवयशदायानी  परमपदाय संकर्षणाय नमः !
श्रीः श्रद्धा सर्वसामर्थ्यमूला  संकर्षणाय नमः !
श्रीः धैर्यः  सर्वसामर्थ्यवर्धिष्णू  संकर्षणाय प्रदयुम्नाय नमः !
श्रीः दया जीवशुद्धमतिः  संकर्षणाय अनिरुद्धाय नमः !
श्रीः अनुकम्पा साक्षात वात्सल्यमूर्तिः  अनिरुद्धाय नमः !
श्रीः क्षमा भवतारिणी ॐ अनिरुद्धाय आल्हादिनीपतये नमः !

         
-त्यानंतर नऊ लोटांगणे घालावीत . 

        -ह्यालाच श्रीवर्धमान व्रताधीराजाचे ''उद्यापनम'' असे म्हणतात. 

          -उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ''त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम तोरण'' सन्मानपूर्वक
काढून पवित्र जागी ठेवावे. 
मंगलम तोरण लावण्यास हरकत नाही व असे इतर वेळचे तोरण कापडाचेही असण्यास
हरकत नाही. 

-श्रीवर्धमान व्रताधीराज म्हणजे परमात्म्याच्या नऊ-अंकुर-ऐश्वर्यांची प्राप्ती करून घेण्याचा महामार्ग. ह्या व्रतास फक्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेसच आरंभ करता येतो.

-मार्गशीर्षपौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती अशा पवित्रदिनी सुरु होणारे हे व्रत आधुनिक नववर्षाच्या प्रथम दिवसास स्वतःच्या उदरात सामावून घेते व आपोआपच नवीन वर्षासाठी शुभ स्पंदनांचा लाभ होतो व भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतात. 

-काही अत्यावश्यक कारणांमुळे मधे खंड पडल्यास तितक्या दिवसांच्या दुप्पट दिवस व्रतात वाढवावेत. 

-परंतु सहा दिवसांपेक्षा ( एकत्रित व अलग अलग ) आर्थिक दिवसांचा खंड पडल्यास व्रत दुपटीने दिवस वाढवूनसुद्धा  पूर्ण होत नाही. अशा वेळेस दुःख न मानता व्रत स्थगित करावे व पुढील वर्षी व्रत जरूर करावे. 

-नाईलाजामुळे व्रत अपूर्ण राहिल्यास कुठ्लेही पाप अथवा दोष लागत नाही. 

-''नरक''कुठे वर आकाशात किवा पाताळात नसतो तर तो जीवनातच प्रारब्धामुळे उत्पन्न होत असतो, श्रीवर्धमान व्रताधीराजाचे पालन करण्याने मनुष्याच्या जीवनात ''नरकयातना'' कधीच येत नाहीत.

-श्रीवर्धमान व्रतीधीराजच्या पालनात स्थूल, सूक्ष्म व तरल ह्या तीनही स्तरांवर भगवंतकृपेने आपोआपच प्रत्येक गोष्ट संपन्न होते.

 " मी  अंबज्ञ  आहे , आम्ही  अंबज्ञ  आहोत "

No comments:

Post a Comment